स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

धार्मिक

सोलापूरचा मानाचा ‘आजोबा गणपती’ १४०व्या वर्षात पदार्पण पर्यावरणपूरक मूर्तीची पारंपरिक पूजा, सामूहिक अथर्वशीर्ष पठण २८ ऑगस्टला

सोलापूरचा मानाचा ‘आजोबा गणपती’ १४०व्या वर्षात पदार्पण पर्यावरणपूरक मूर्तीची पारंपरिक पूजा, सामूहिक अथर्वशीर्ष पठण २८ ऑगस्टला

सोलापूर : देशातील सार्वजनिक स्वरूपात साजरा होणाऱ्या पहिल्या गणेशोत्सवांपैकी एक असलेल्या आणि सोलापूरचा मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आजोबा गणपती’ची प्रतिष्ठापना यंदा १४०व्या वर्षात पदार्पण करत आहे. या प्रतिष्ठापनेची मानाची पूजा ट्रस्टचे अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख आणि उपाध्यक्ष काकासाहेब मेंडके यांच्या हस्ते पार पडली.

या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची पूजा पारंपरिक पद्धतीने संपन्न झाली. रुद्रपठण, रुद्राभिषेक, गणेश १००० नामावली आणि अथर्वशीर्ष पठण अशा वैदिक विधीने पूजा करण्यात आली. या पूजन विधीचे पौराहित्य वेदमूर्ती स्वामी महाराज यांनी केले.

या वेळी ट्रस्टचे मान्यवर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये चंद्रकांत कळमणकर, अनिल नंदीमठ, अनिल सावंत, कमलाकर करमाळकर, इरण्णा मेंडके, सिद्धारूढ निंबाळे, सुनील जवळकर, काका मेंडके, विकास भास्कर, सुरेश हचडे, रविकिरण सूत्रावे, सातलिंगप्पा दुधनीकर, राहुल कुमणे, अमर वनारोटे, गंगाधर गवसणे, राजकुमार कत्ते, बसवराज मेंडके, अप्पासाहेब जेऊरे, विश्वनाथ गोयल आणि अनिल रेळेकर यांचा समावेश होता.

प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर महाआरती करण्यात आली व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.

दरम्यान, येत्या गुरुवार, दि. २८ ऑगस्ट रोजी पहाटे ६ वाजता ट्रस्टतर्फे सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व गणेशभक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टने केले आहे.

 

#ganesfestival2025 #solapur #ajobaganpati
 

संबंधित बातम्या