स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

धार्मिक

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. प्रस्तावित चबुतरा व पुतळा उभारणीची कामे नियोजनानुसार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.

महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत अक्षय तृतीयेपूर्वी पुतळा बसवण्याचे आणि परिसरातील सुशोभीकरणाची सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. कामे युद्धपातळीवर सुरू असून कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी मध्यवर्ती महामंडळ व बसवेश्वर सर्कलच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात महापौरांनी बसवेश्वर महाराजांचे विचार समाजासाठी दिशादर्शक असल्याचे नमूद करत पुतळा उभारणी व परिसर विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमास नगरसेवक अक्षय अंजीखाने यांनी उपस्थित राहून महापौर व उपमहापौरांचे आभार मानले व कामासाठी सहकार्याची भूमिका स्पष्ट केली. परिसरातील नागरिक व बसवप्रेमींनीही कामे लवकर पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगर अभियंता सारिका अकुलवार, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी, तसेच इतर मान्यवर व बसवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Solapur Municipal Corporation, Solapur

संबंधित बातम्या