मुंबई/तुळजापूर : कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारात परंपरेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम पवित्रा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी घेतला आहे.
“या मंदिराला पुरातात्त्विक व स्थापत्यशास्त्रीय मूल्य आहे. हे श्रद्धा आणि निष्ठेचं स्थान आहे. त्यामुळे धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच जीर्णोद्धाराची कामं होणार आहेत,” असे शेलार यांनी स्पष्ट केले.
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, धाराशिव जिल्हाधिकारी पुजारा, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालक डॉ. तेजस गर्गे, मंदिराचे महंत, पुजारी तसेच भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकारी श्रीलक्ष्मी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थित होत्या.
सरकारचा उद्देश स्पष्ट असून जीर्णोद्धाराची कामं परंपरा आणि सांस्कृतिक मूल्य अबाधित ठेवूनच राबवली जातील, असा विश्वास शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.
#tuljapur #ashishshelar #tuljabhavnitemple