सोलापूर : अखेर बहुप्रतिक्षित बसवेश्वर सर्कल (कोंतम चौक) येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा उभारणी कामाला सुरुवात झाली.
जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा उभारणीचे काम गेली तीन वर्षे सुरू होते. पण काम पूर्ण होत नव्हते. महापालिका प्रशासनाकडून या कामात दिरंगाई होत होती. यामुळे बसव प्रेमींच्या मनात रोष निर्माण झालेला होता. प्रशासनाला जाग यावी यासाठी शहर जिल्ह्यातील बसव प्रेमींनी शनिवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. त्याची दखल घेऊन प्रशासन कामाला लागले. नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी उपोषण स्थळी येऊन सांगितल्याप्रमाणे आज सोमवारी कामाला सुरुवात झाली.
केंद्रीय आयुष मंडळाचे सदस्य व शिव-बसव चरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे व महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मंडळ (जुळे सोलापूर)चे अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांच्या हस्ते पुतळा उभारणी कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी चंद्रकांत रमणशेट्टी, ऍड. राजशेखर बिराजदार-पाटील, वीरेंद्र हिंगमिरे, आनंद मुस्तारे, गणेश चिंचोळी, बाबासाहेब कुलकर्णी, शिवलिंगप्पा शाबादे, विश्वनाथ आमणे, दशरथ वडतीले, बसवराज बगले, चन्नवीर चिट्टे, शशिकांत बिराजदार, सकलेश बाभुळगावकर, भीमाशंकर पदमगोंडा, दयानंद भोरे, वैभव विभुते, सिंधुताई काडादी, पुष्पा गुंगे, शशिकला रामपुरे, प्रार्थना बिज्जरगी, वर्षा विभुते, विद्या जोडभावी, स्मिता नाईक, माधुरी बिराजदार, रेश्मा निडगुंदी, साक्षी हौदे उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजशेखर बुरकुले यांनी तर आभार प्रदर्शन अमित रोडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बसवराज लोहार, सुनील धरणे, विजयकुमार बिराजदार, सोमनाथ चौधरी, राहुल जत्ती, सिद्राम छपेकर, विशाल पाटील, राहुल कत्ते यांनी परिश्रम घेतले.
#solapurcity #renewation #mahatmabasveshwar #dailynews