स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

सोलापूर शहर

उपमहापौर देवकर यांची तत्परता ठरली निर्णायक; भुईकोट किल्ल्यातील आग विझवण्यात यश

उपमहापौर देवकर यांची तत्परता ठरली निर्णायक; भुईकोट किल्ल्यातील आग विझवण्यात यश

सोलापूर:-  बुधवारी दि. 25 फेब्रुवारी सायंकाळी सुमारे सातच्या दरम्यान शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरातील खंदक बागेत अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीचे प्रचंड गोळे बाहेर दिसत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती एका सजग नागरिकाने तात्काळ सोलापूरच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी विलंब न लावता अग्निशामक अधिकारी साळुंके यांच्याशी संपर्क साधत अग्निशामक दलाची गाडी त्वरित घटनास्थळी रवाना केली. अग्निशामक दलाच्या तत्पर कार्यवाहीमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.

घटनास्थळी उपमहापौर देवकर यांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजनांच्या सूचना दिल्या. पुरातत्व विभाग, महापालिका, पोलीस प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून भुईकोट किल्ला व बागेच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आगीत काही प्रमाणात वृक्षांना फटका बसला असला तरी मोठी हानी टळली आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत चौकशी सुरू आहे. काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही तरुण किल्ल्याच्या पळवाटेतून आत प्रवेश करून अंमली पदार्थांचे सेवन करतात, त्यामुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रसंगी सुरक्षा कर्मचारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी, महापालिका कर्मचारी, महानगरपालिका अग्निशामक दलाचे जवान तसेच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर उपस्थित होते.

उपमहापौर देवकर यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Solapur Municipal Corporation, Solapur 

संबंधित बातम्या