स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

सोलापूर शहर

मराठा समाजाला महापौरपदाचा न्याय द्या; अन्यथा अधिक आंदोलन तीव्र करू राम जाधवांचा इशारा

मराठा समाजाला महापौरपदाचा न्याय द्या; अन्यथा अधिक आंदोलन तीव्र करू राम जाधवांचा इशारा

सोलापूर :- मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त करत मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. गेल्या तीस वर्षांत मराठा समाजातील प्रतिनिधीला महापौरपदाची संधी मिळालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

जाधव म्हणाले की, सत्ताधारी भारतीय जनता पार्टी सरकारने सर्वसाधारण प्रवर्गातील जागेवरही ओबीसी समाजातील उमेदवाराला महापौरपदी संधी दिली. त्यामुळे मराठा समाजावर अन्याय होत असल्याची भावना समाजामध्ये तीव्र झाली आहे. “महापौरपदावर मराठा समाजाचा प्रतिनिधी बसवला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आले. या वेळी विविध घोषणा देत सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी “मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे” अशी जोरदार मागणी केली. राम जाधव यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवरही टीका करत, मराठा समाजाच्या भावनांचा विचार न केल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, समाजाच्या हक्कांसाठी शांततामय आणि लोकशाही मार्गाने लढा सुरू राहील.

या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात या प्रश्नावर आणखी व्यापक आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

#solapur #marathareservation #CMO #Ramjadhavsolapur #manojjarangepatil

संबंधित बातम्या