स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

सोलापूर शहर

पाळणा कार्यक्रम व मिरवणुकीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल

पाळणा कार्यक्रम व मिरवणुकीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल

सोलापूर – श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून बुधवार दि. 18 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त पाळणा कार्यक्रम होणार आहे तर शिवजयंती उत्सवानिमित्त गुरुवार दि. 19 फेब्रुवारी रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहेत त्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे असे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढले आहेत.

डाळिंबीआड येथून मुख्य मिरवणुकीची सुरुवात होऊन पुन्हा डाळिंबीआड तर अन्य ठिकाणांहून निघणाऱ्या मिरवणुकांची छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगता होते.

हे आहेत मिरवणुकी दिवशी बंद राहणारे मार्ग
डाळिंबआड – शिंदे चौक ते सरस्वती बुक डेपो – नवीपेठ येथील पारसी इस्टेट – मेकॅनिकल चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – तरटी नाका पोलीस चौकी बाळीवेस – टिळक चौक – मधला मारुती – माणिक चौक – कसबा चौकी – खाटीक मज्जिद – दत्त चौक – राजवाडे चौक – जुने विठ्ठल मंदिर – चौपाड यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक – सरस्वती चौक – मेकॅनिक चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक वाहतूक बंद राहणार

 

हे आहेत मिरवणुकी दिवशीचे पर्यायी मार्ग
जुना पुणे नाका ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी, जुना पुणे नाका : हॉटेल ॲम्बेसिडर – निराळे वस्ती – कल्पना कॉर्नर – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक – रेल्वे स्थानक – सात रस्ता मार्गे विजापूर रोड विमानतळ व सात रस्त्याकडून हैदराबाद, तुळजापूर व पुण्याकडे जाण्यासाठी : सात रस्ता – रंगभवन चौक सिविल चौक पोटपाडी चौक – विवोको प्रोसेस – शांती चौक – जुना बोरामणी नाका – मार्केट यार्ड मागे पर्यायी मार्गे इच्छितस्थळी जाता येणार

 

हे मार्ग असणार बुधवारी वाहतुकीसाठी बंद
जुना पुणे नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक
सम्राट चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक
निराळे वस्ती ते हॉटेल सुप्रभात छत्रपती शिवाजी महाराज चौक
मेकॅनिक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक
तरटी नाका चौकी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक
काळी मज्जिद ते हॉटेल दिलखुश, छत्रपती शिवाजी महाराज चौक

 

हे आहेत बुधवारी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
पुणे रस्त्याने येणाऱ्या वाहनांसाठी : जुना पुणे नाका – अँबेसिडर हॉटेल – निराळे वस्ती – कल्पना कॉर्नर – भैय्या चौकमार्गे
सम्राट चौक – बाळवेस मार्गे थ
तरटी नाका – बाळवेस मार्गे
काळी मज्जिद – शिंदे चौक – दत्त चौक मार्गे
मेकॅनिकी चौक – सरस्वती चौक – लकी चौक – दत्त चौक मार्गे इच्छितस्थळी जाता येणार 

 

#सोलापूर #छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा #2026 #सोलापूर शहर #वाहतूक बदल

 

 

संबंधित बातम्या