स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

सोलापूर शहर

तक्रारींकडे दुर्लक्ष महागात! मनपाकडून १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

तक्रारींकडे दुर्लक्ष महागात! मनपाकडून १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

सोलापूर | प्रतिनिधी :- नागरिकांच्या तक्रारी वेळेत न सोडवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोलापूर महानगरपालिकेने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. तक्रार निवारण प्रक्रियेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी तब्बल १५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मनपाच्या तक्रार पोर्टल तसेच ‘माय सोलापूर’ ॲपवर नोंदवलेल्या तक्रारींचा मुदतीत निपटारा न केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नागरिकांच्या समस्या वेळेत सोडवण्याबाबत मनपा प्रशासन आता अधिक सतर्क झाले असून, भविष्यातही अशीच कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई
कारवाई झालेल्यांमध्ये विविध विभागीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


विभागीय कार्यालय क्र. १ : अजिंक्य साळुंखे, आकाश पाटील, सुचेता आमणगी


विभागीय कार्यालय क्र. २ : राघवेंद्र बिराजदार


विभागीय कार्यालय क्र. ३ : अनिकेत कांबळे


विभागीय कार्यालय क्र. ४ : संजय कोळी


विभागीय कार्यालय क्र. ५ : परशुराम बोमकंटी


विभागीय कार्यालय क्र. ६ : अजिंक्य विपत, राघवेंद्र देवकर, कुलदीप जगदाळे


विभागीय कार्यालय क्र. ७ : अक्षय फुंदे


विभागीय कार्यालय क्र. ८ : श्रीरंग नादरगी


घनकचरा व्यवस्थापन विभाग : मुबारक शेख, शिवप्रसाद कुलकर्णी
नगर रचना विभाग : प्रमोद गोविंदवार


मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही. तक्रार निवारण यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी नियमित आढावे घेतले जाणार असून, कामात कसूर आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

#solapur #solapurmuncipalcorporation #strictlyaction #dailynews

संबंधित बातम्या