स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

सोलापूर शहर

मतदार यादीतील हरकती, दुबार नोंदी व मतदान केंद्रांचे काम वेगाने पूर्ण करा – आयुक्त डॉ. ओम्बासे

मतदार यादीतील हरकती, दुबार नोंदी व मतदान केंद्रांचे काम वेगाने पूर्ण करा – आयुक्त डॉ. ओम्बासे

सोलापूर :- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मतदार यादी, दुबार नोंदी आणि मतदान केंद्र निश्चितीच्या कामांचा वेग वाढवण्याचे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या सविस्तर आढावा बैठकीत त्यांनी “कंट्रोल चार्टमध्ये चूक अजिबात चालणार नाही; त्रुटी आढळल्यास जबाबदारी उपतुकडी प्रमुखांचीच” असा इशारा दिला.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहायक अभियंता रामचंद्र पेंटर, अधिकारी निकते, संदीप भोसले तसेच सर्व उपतुकडी प्रमुख व तांत्रिक समन्वयक उपस्थित होते.

प्रारूप मतदार यादीवरील हरकती – 555 अर्जांची तपासणीदि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर 555 हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यावरील कार्यवाहीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. डॉ. ओम्बासे यांनी सांगितले की अंतिम मतदार यादीचा कंट्रोल चार्ट अचूक आणि बिनचूक असणे अत्यावश्यक आहे, कारण अपलोड झाल्यानंतर दुरुस्ती शक्य नाही.

तुकडी प्रमुखांनी प्रत्येक तपशील स्वतः पडताळूनच माहिती अंतिम करावी,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्रुटी आढळल्यास उपतुकडी प्रमुख स्वतः जबाबदार राहतील, असेही त्यांनी नमूद केले.

दुबार मतदारांची तपासणी – निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश

राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त प्रभागनिहाय दुबार मतदारांची यादी काटेकोरपणे तपासून स्थल सर्वेक्षण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. 29 ऑक्टोबर 2025 रोजी आयोगाने जारी केलेल्या दिशा-निर्देशांनुसार संबंधित छाननी तातडीने पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली.

 

मतदान केंद्र निश्चिती – अंतिम मुदती जाहीर

राज्य निवडणूक आयोगानुसार:

• 15 डिसेंबर 2025 : प्रभागनिहाय अंतिम मतदान केंद्र सूची

• 20 डिसेंबर 2025 : कंट्रोल चार्ट प्रणालीमध्ये माहिती नोंद

• 27 डिसेंबर 2025 : मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध

मतदारांना योग्य मतदान केंद्राशी जोडणे आणि तांत्रिक नोंदी वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

निवडणुकीची सर्व कामे वेळेत आणि त्रुटीविरहित पूर्ण करा” – आयुक्त 

कामात कोणतीही ढिलाई होऊ नये, याची कडक सूचना देताना आयुक्त डॉ. ओम्बासे म्हणाले— मतदार यादीची अचूकता आणि मतदान केंद्रांची योग्य रचना ही संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची आधारभूत पायरी आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम पूर्ण करावे.”

#SolapurNews #ElectionUpdate #VoterList #MunicipalElection2025 #AdminUpdates

संबंधित बातम्या