सोलापूर | शहरातील हृदयस्थानी असलेल्या जुनं स.न. 330 आणि नवीन स.न. 113 या महत्त्वाच्या भूखंडांच्या आरक्षण बदलावरून मोठा वाद पेटला आहे. सोलापूर महानगरपालिकेने अलीकडेच या जागेच्या नवीन आरक्षणासंबंधी नोटिसा देत प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र या बदलामुळे नागरिकांसह स्थानिक संस्थांचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून करण्यात येत आहे.
उपजिल्हाप्रमुख रविकांत सिद्राम कांबळे यांनी आज आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सांगितले की —
👉 सदर जागेवर पूर्वीचे आरक्षण रद्द करून नवीन आरक्षण लावण्याचा प्रयत्न नागरिकांच्या हिताला घातक आहे.
👉 या जागेच्या शेजारी शिवशंकर मंगल कार्यालय व फ्लोरा कॉम्प्लेक्स स्थित असून, बदलामुळे वाहतूक व नागरी सोयींवर गंभीर परिणाम होणार.
👉 नागरिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून झाडे तोडणे किंवा जागेचा अपव्यय करणे अयोग्य आहे.
कांबळे यांनी स्पष्ट इशारा दिला की—
\"सदर जागेचे आरक्षण जसे आहे तसेच राहिले पाहिजे. अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार. यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी महापालिकेची असेल.\"
निवेदनाची प्रत संबंधित विभागाला देखील पाठवण्यात आली असून आता महापालिकेची भूमिका काय असणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
#solapur #mahanagarpalika #ayukt #ShivsenaUBT