सोलापूर : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील वाढत्या अस्वच्छतेवर आणि प्रवासी सुविधांच्या बिघडलेल्या व्यवस्थेवर अखेर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धडक कारवाई केली. गुरुवारी अचानक केलेल्या पाहणीतच शौचालयातील दुर्गंधी, कचरा, घाण आणि ढिसाळ व्यवस्थापनामुळे प्रशासनाचे हलगर्जीपण उघड झाले.
महिलांकडून शौचालयासाठी अवाजवी शुल्क आकारल्याच्या तक्रारी मंत्र्यांसमोरच झाल्या. पाणपोई परिसरातील कचऱ्याचा ढिगारा आणि अस्वच्छ वातावरणावर सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आगार व्यवस्थापक आणि वाहतूक नियंत्रक यांच्या समाधान न देणाऱ्या उत्तरांवरून व्यवस्थापकाला त्वरित कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश त्यांनी दिले.
सरनाईक यांचे कठोर निर्देश :
“चार दिवसांत सर्व त्रुटी दूर करा. पुढील पाहणीत पुन्हा अस्वच्छता दिसली तर थेट निलंबनाशिवाय पर्याय नाही.”
एस.टी. महामंडळ प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सेवा देण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सोलापूर बसस्थानकातील ही अचानक झाडाझडती आणि मंत्रालयाच्या पातळीवरून मिळालेले कडक निर्देश प्रशासनासाठी ‘वॉर्निंग बेल’ मानले जात आहेत.
#pratapsarnaik #transportminister #solapurststand #bignews