स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

सोलापूर शहर

सोलापूर शहरात कलम 37(1) आणि 37(3) लागू — 12 ते 26 ऑक्टोबरदरम्यान जमावबंदी

सोलापूर शहरात कलम 37(1) आणि 37(3) लागू — 12 ते 26 ऑक्टोबरदरम्यान जमावबंदी

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर शहरात दिपावली, श्री लक्ष्मी कुबेर पूजन, पाडवा, भाऊबीज अशा उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तसेच वक्फ अध्यादेश, मराठा–ओबीसी–धनगर आरक्षण अशा संवेदनशील विषयांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत कलम 37(1) व 37(3) लागू करण्यात आले आहे.

हे आदेश 12 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 00.01 वाजल्यापासून 26 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत लागू राहतील, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. आश्विनी पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

🔹 कलम 37(1) अंतर्गत बंदी असलेल्या कृती:
• मिरवणुका, सभा, पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव
• शस्त्रे, सोटे, तलवारी, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा इजा करण्यास वापरता येणाऱ्या वस्तू
• ज्वालाग्राही व स्फोटक पदार्थ
• दगड, फेकावयाची उपकरणे, प्रतिमा किंवा प्रेतयात्रांचे प्रदर्शन
• सार्वजनिक घोषणा, असभ्य हावभाव, ग्राम्य भाषा
• जाती-धर्माच्या भावना दुखावणारे सोंगे, चिन्हे किंवा साहित्य

या आदेशाचा अपवाद फक्त त्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असेल ज्यांना कर्तव्याच्या निमित्ताने वरील वस्तू हाताळाव्या लागतात किंवा ज्यांनी सक्षम पोलीस प्राधिकरणाची परवानगी घेतलेली आहे.

🔹 कलम 37(3) अंतर्गत जमावबंदी:

या आदेशानुसार पाच किंवा पाचहून अधिक लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तथापि, लग्न, अंत्ययात्रा यांसारख्या समारंभांना ही बंदी लागू राहणार नाही.
मिरवणुका, मोर्चे, रॅली, आंदोलने, सभा इत्यादी कार्यक्रम सक्षम पोलीस प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेऊनच आयोजित करता येतील.

#solapurcitypolice #solapurmuncipalcorporation

संबंधित बातम्या