स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

धार्मिक

तुळजापूरकडे पायी निघालेल्या देवी भक्तांना शिवराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाचे वाटप

तुळजापूरकडे पायी निघालेल्या देवी भक्तांना शिवराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाचे वाटप

 

तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या देवी भक्तांच्या सेवेसाठी शिवराष्ट्र प्रतिष्ठान मित्र परिवाराच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला आणि प्रसादाचा लाभ घेतला.

या वेळी शिवराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक मल्लू सलगरे, एस.एम.यू. फाउंडेशनचे अध्यक्ष सागर माने, गोकुळ प्रतिष्ठानचे सागर कलागते, महावीर तालीमचे प्रथमेश  कोलूर, सिद्धार्थ प्रतिष्ठानचे आदित्य वाघमारे, ककया तालीमचे तुषार  खरडमल, कुंदन  ऐवळे, संदीप शिंदे, रोहित मिश्रा, राहुल वटकर, तेजस कांबळे, साई आधी आणि आदर्श शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

या सेवाभावी उपक्रमातून देवी भक्तांना समाधान मिळाले असून, श्रद्धा आणि सेवाभावाचे अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवण्यात आले आहे. आयोजकांनी भाविकांचे मनःपूर्वक स्वागत करत त्यांच्या यात्रेला शुभेच्छा दिल्या.

 

संबंधित बातम्या