स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

राजकारण

सोलापुरात कंत्राटदारांचे भव्य आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांसमोर शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा

सोलापुरात कंत्राटदारांचे भव्य आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांसमोर शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा

सोलापूर, दि. १९ ऑगस्ट –महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, हाॅट मिक्स असोसिएशन, मजूर सहकारी संस्था आणि सोलापूर काॅन्ट्रॅक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने आज सोलापूर जिल्हा परिषदेसमोरच्या पुनम गेट येथे कंत्राटदारांचे भव्य धरणे आंदोलन झाले.

गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेली देयके शासन देत नसल्यामुळे कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वित्तीय संस्था दमदाटी करून वसुली करत असून, कंत्राटदारांचे सिबिल खराब होत आहे, अशी परिस्थिती यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली.

या आंदोलनास काँग्रेस पक्षानेही पाठिंबा दिला. जिल्हाध्यक्ष शांतलिंग शटगार, शहराध्यक्ष चेतन नरोटे व सरचिटणीस विनोद भोसले यांनी मंडपात येऊन लिखित पत्राद्वारे समर्थन जाहीर केले.

राज्यातील ३५ जिल्ह्यांत अशा आंदोलनांचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून विषय शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले. तसेच मुख्यमंत्री–उपमुख्यमंत्री सोलापुरात आल्यानंतर भेट आयोजित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

या आंदोलनात जलजीवन मिशनसह इतर विभागांशी निगडित कंत्राटदारांच्या समस्या मांडण्यात आल्या. आंदोलनात राज्याध्यक्ष मिलिंद भोसले, माजी राज्याध्यक्ष दत्तात्रेय मुळे, संतोष कलगुटगी, शंकर चौगुले, शिवानंद पाटील, रामभाऊ धुधाळ यांच्यासह जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कंत्राटदार सहभागी झाले.

#solapur #collectoroffice #andolan

संबंधित बातम्या