स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

राजकारण

महापालिका निवडणुकीआधी सोलापुरात मोठी हालचाल; काडादी–गोरे भेटीने राजकीय गणिते बदलली

महापालिका निवडणुकीआधी सोलापुरात मोठी हालचाल; काडादी–गोरे भेटीने राजकीय गणिते बदलली

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहरातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आणि श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. शुक्रवारी गंगा निवास येथे झालेल्या या भेटीत गोरे–काडादी यांच्यात निवडणूक रणनिती आणि शहराच्या भविष्यासंदर्भात सखोल चर्चा झाली.

या भेटीत धर्मराज काडादी यांनी महापालिका निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहण्याचा शब्द दिला, ही बाब सध्याच्या राजकीय समीकरणांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

या भेटीवेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, शरणराज काडादी, पुष्पराज काडादी उपस्थित होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काडादी यांचे स्वागत स्वीकारून श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे नियोजन तसेच शहराच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर चर्चा केली.

धर्मराज काडादी हे लिंगायत समाजातील मोठे नेतृत्व असून सोलापूर शहरात त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांच्या समर्थनामुळे गोरे गटाला शहरातील निर्णायक मतदारांवर पकड मजबूत होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. काडादी समर्थकांमध्ये या भेटीनंतर समाधान आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

या भेटीला प्रभुराज मैंदर्गीकर, अक्षय अंजिखाने यांचीही उपस्थिती होती.

Devendra Fadnavis Jaykumar Gore Kothe Devendra Rajesh Devendra Rajesh Kothe Sachin Kalyanshetti

संबंधित बातम्या