सोलापूर | प्रतिनिधी : - सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) 13 जुलै 2025 ते 27 जुलै 2025 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) व 37(3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.
या आदेशाचा उद्देश कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हा असून, या कालावधीत काही विशिष्ट कृतींवर बंदी घालण्यात आली आहे.
आदेशानुसार प्रतिबंधित गोष्टी:
• शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, सुरे, झेंडा लावलेली काठी इत्यादी नेणे
• ज्वालाग्राही किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे
• दगड व फेकण्याची उपकरणे बाळगणे
• प्रेत यात्रा, प्रतिमा किंवा कोणत्याही प्रकारचे प्रदर्शन/मिरवणूक
• सार्वजनिक घोषणा, अश्लील हावभाव, ग्राम्य भाषा वापरणे
• जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असे वर्तन
• सोंगे, चिन्हे किंवा भावनांना भडकवणारी प्रचार साहित्ये तयार करून प्रसार करणे
कोणाला सूट?
या आदेशातून शासकीय नोकर, अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, तसेच जिल्हादंडाधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यांकडून परवानगी प्राप्त असलेल्या व्यक्तींना वगळण्यात आले आहे.
नागरिकांना आवाहन:
प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.