सोलापूर | सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध देशी व विदेशी मद्यनिर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात संयुक्त धडक कारवाई करण्यात आली.
दि. 18/01/2026 ते 26/01/2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रे, बनावट देशी-विदेशी मद्य विक्री ठिकाणे तसेच अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान सुमारे 34 गुन्हे दाखल करण्यात आले असून 28 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कारवाईत देशी व विदेशी मद्य, हातभट्टी दारू, रसायने, कच्चा माल, बनावट लेबले, झाकण, वाहने आदी एकूण सुमारे 9 लाख 57 हजार 202 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच मद्यपानास परवानगी देणाऱ्या व अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री. श्रीमती माधुरी पाटील, उपअधीक्षक, निरीक्षक व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
अवैध मद्यविक्री, निर्मिती व वाहतुकीविरोधात पुढील काळातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अवैध मद्यविक्रीबाबत माहिती दिल्यास टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 किंवा नजीकच्या उत्पादन शुल्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
#solapur #crimenews #excisedepartmentaction #dailynews #swarjyamarathinews