स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

गुन्हेगारी

चैनीसाठी चोरलेल्या 15 दुचाकी जप्त; सोलापूर शहर गुन्हे शाखेची दमदार कारवाई

चैनीसाठी चोरलेल्या 15 दुचाकी जप्त; सोलापूर शहर गुन्हे शाखेची दमदार कारवाई

सोलापूर :- दिनांक १५/०७/२०२५ रोजी, गुन्हे शाखेकडील, सपोनि/शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथक असे मालाविषयी गुन्हे करणारे आरोपींचा सोलापुर शहर हद्दीत शोध घेत असताना, एक संशयीत इसम हा, चोरी केलेली मोटार सायकल घेवुन, शेळगी रोड, सोलापुर याठिकाणी उभा असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली. प्राप्त माहितीचे आधारे, सपोनि/शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथकाने, नमूद संशयीत इसमास ताब्यात घेतले. त्यावेळी, नमूद इसमास त्याचे नाव, पत्ता व त्याचे ताब्यातील मोटार सायकल बाबत विचारपूस केली असता त्याने, त्याचे नाव कृष्णात ऊर्फ अण्णा महादेव डोंगरे, वय २५ वर्षे, रा. मु.पो. मंगळुर, ता. तुळजापुर, जि. धाराशिव असे असल्याचे सांगितले. तसेच नमूद इसमाकडे अधिक चौकशी केली असता, त्याने सोलापुर शहर, लातुर, पुणे, इंदापुर, भिगवण, रत्नागिरी, बिदर (कर्नाटक) येथुन, एकूण १२ मोटार सायकली चोरलेची कबुली दिली. त्यांनतर, सपोनि/शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार पोकों/काशिनाथ वार्धी यांनी तसेच, इतर पोलीस अंमलदार यांनी, नमूद आरोपीकडे कौशल्याने तपास केला असता, त्याने, चोरी केलेल्या एकूण १२ मोटार काढून दिल्या.

 तसेच, दिनांक ०९/०७/२०२५ रोजी, सपोनि/शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी, प्राप्त गोपनिय माहितीचे आधारे, इसम नामे शुभम भागवत सावंत, वय २८ वर्षे, रा. चिंचोली, ता. तुळजापुर, जि.धाराशिव, सध्या मुपो. मंगळुर, ता. तुळजापुर, जि. धाराशिव यास, सोलापूर शहराचे, जुना पुणे नाका येथील ब्रिज जवळचे ठिकाणाहून, चोरीचे मोटार सायकलसह ताब्यात घेतले. त्यावेळी, त्याचेकडे अधिक विचारपूस करता, त्याने, सोलापूर शहरामध्ये ०३ मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार, त्याचेकडून ०३ मोटार सायकली जप्त करणेत आले आहेत. त्याबाबत, खालील नमूद तक्त्यातील मोटार सायकली चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.अशा प्रकारे, शहर गुन्हे शाखेकडील, सपोनि/शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथकाने, आरोपी नामे-१) कृष्णाथ ऊर्फ अण्णा महादेव डोंगरे व २) शुभम भागवत सावंत यांना ताब्यात घेवुन, चोरीचे एकूण १५ मोटार सायकली जप्त करून, एकूण ०७,७०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 सदरची कामगीरी, मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. सुनिल दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि/शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश भोसले, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, अभिजीत धायगुडे, काशिनाथ वाघे, सायबर पोलीस ठाणे कडील अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छींद्र राठोड, यांनी केली आहे.

 

 

संबंधित बातम्या