सोलापूर : सोलापूर शहर गुन्हे शाखेने अवैध शस्त्रविक्रीप्रकरणी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून देशी बनावटीची पिस्तूल, आठ जिवंत काडतुसे व मोटारसायकल असा सुमारे १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध शस्त्रांचा वापर रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीद्वारे माहिती मिळाली की, रेल्वे कॉलनी परिसरात काही इसम शस्त्रविक्रीसाठी थांबले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान आरोपींकडून एक देशी बनावटीची पिस्तूल, आठ काडतुसे व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली असून, शहरात अवैध शस्त्रांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्वीनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री. राजन माने, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार संताजी रोकडे, अनिल जाधव, महेश शिंदे, भारत पाटील, कुमार शेळके, राजु मुदगल, महेश पाटील, महेश रोकडे, अंकुश भोसले, सुभाष मुंडे, सिध्दाराम देशमुख, राजेश मोरे, अजय गुंड, सायबर पो.स्टे. कडील प्रकाश गायकाड, मच्छिद्र राठोड, चालक, सतिश काटे, बाळु काळे यांनी केली आहे.
#solapur #crime #solapurpolice #solapurelection