स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

राजकारण

सोलापूर महापालिका निवडणूक 2026 : इच्छुक उमेदवारांनी 23 कागदपत्रांची तात्काळ तयारी ठेवा, अन्यथा..

सोलापूर महापालिका निवडणूक 2026 : इच्छुक उमेदवारांनी 23 कागदपत्रांची तात्काळ तयारी ठेवा, अन्यथा..

सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्यक असलेल्या 23 महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्वतयारी तात्काळ करून ठेवणे अनिवार्य ठरणार आहे.
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर वेळेअभावी अनेक उमेदवारांची धावपळ होते. त्यामुळे ओळखपत्रे, आर्थिक व्यवहारांची माहिती, मालमत्ता-गुंतवणूक तपशील, जात व वैधता प्रमाणपत्रे, आयकर विवरणपत्रे, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील, शैक्षणिक माहिती तसेच सोशल मीडिया खात्यांची माहिती आदी सर्व कागदपत्रे आधीच सज्ज ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः मालमत्ता, वाहने, दागिने, कर्ज, गुंतवणूक, थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र आणि पूर्वी लढविलेल्या निवडणुकांचा तपशील अचूक व अद्ययावत असणे गरजेचे आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास उमेदवारी अर्ज बाद होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.

कागदपत्रांची यादी पुढीलप्रमाणे 👇

सोलापूरातील इच्छुक उमेदवारांनो ही 23  कागदपत्रे तयारी ठेवा अन्यथा...
सोलापूर  सार्वत्रिक महानगर पालिका निवडणूक 2026 साठी सर्व इच्छुक उमेदवारांना खालील माहिती व कागदपत्रांची पुर्व तयारी तात्काळ करुन घ्यावी लागेल.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक - 2025

१) अर्जदाराचे दोन पासपोर्ट फोटो (आजरोजी काढलेले)
२) अर्जदाराचे निवडणूक ओळखपत्र
३) अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड / ड्रायव्हींग लायसन्स / शाळा सोडल्याचा दाखला / जन्म प्रमाणपत्र
४) अर्जदाराचे नावे राष्ट्रीयकृत बँकेत आचारसंहिता लागू झाल्यानंतर काढलेले खात्याचे बँक पासबुक
५) अर्जदार व सुचत यांच्या यादीतील नावाची प्रत व त्यांचे निवडणूक ओळखपत्र
६) जात प्रमाणपत्र / वैधता प्रमाणपत्र / वैधता तपासणीसाठी प्रस्ताव सादर केल्याची पावती.
७) अर्जदाराच्या अपत्यांची संख्या व त्यांची जन्म तारीख
८) अर्जदार, अर्जदाराची पत्नी व अर्जदाराची मुले यांच्या नावावर असलेल्या वाहना संदर्भातील तपशिल / किंमत / बनावट / सध्याचे बाजार मुल्य
९) अर्जदार, अर्जदाराची पत्नी व अर्जदाराची मुले यांच्या नावावर असलेल्या मिळकत घर / फ्लॅट / शेती व इतर संबंधित तपशिल सर्वे नंबर / गट नंबर / सध्याचे बाजार मुल्य
१०) अर्जदार, अर्जदाराची पत्नी व अर्जदाराची मुले यांच्या नावावर असलेल्या सोना - चांदी व इतर दागिन्याबाबत माहिती व सध्याचे बाजार मुल्य
११) अर्जदार, अर्जदाराची पत्नी व अर्जदाराची मुले यांच्या नावावर असलेल्या बँकेचे शेअर्स / भाग व संचालक इत्यादी असल्यास त्याचा तपशील
१२) शासकिय निवास्थाना असल्यास त्याचा कालावधी व थकबाकी बाबत माहिती (NOC)
१३) यापुर्वी लढविलेल्या निवडणुकांचा तपशील (वर्ष / त्यातील मिळकतीचे मुल्यांकन व दर्शविलेला खर्च)
१४) अर्जदार अर्जदाराची पत्नी व अर्जदाराची मुले यांच्या नावावर असलेल्या एलआयसी पॉलिसी व इतर गुंतवणुकीचा तपशील
१५) अर्जदार, अर्जदाराची पत्नी व अर्जदाराची मुले यांच्या नावावर असलेल्या शासकिय निमशासकिय, खाजगी वा इतर कर्जाची माहिती.
१६) अर्जदाराचे नावात बदल असल्यास त्याबाबत शपथपत्र
१७) अर्जदाराचे नावे आयकर भरणा केलेल्या तीन वर्षांचा तपशिल
१८) अर्जदाराच्या विरूध्द प्रलंबित असलेल्या गुन्हयाचा तपशिल (गुन्हा क्रमांक / कलम / पोलीस स्टेशन / सबंधित न्यायालय)
१९) अर्जदाराला दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली असल्यास त्याच्या न्यायनिवाडयाची प्रत व केलेल्या अपिलाचा तपशिल
२०) मान्यताप्राप्त राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवित असल्यास AB फॉर्मची प्रत scn
२१) शैक्षणिक माहिती ज्यामध्ये शेवटी शिकलेली शाळा / महाविद्यालय, टिसीची प्रत
२२) ईमेल आयडी, फेसबूक आयडी, Twitter, Instagram च्या आयडी व त्यांचे मोबाईल नंबर
२३) नगरपालिका/ महानगरपालिका यांचेकडून थकबाकी नसल्याबाबत प्रमाणपत्र

#solapur #smcelection #bigupdate #maharashtra 

संबंधित बातम्या