सोलापूर - २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान गौरव परीक्षेचे आयोजन केले असल्याची माहिती राज्यकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर यांनी दिली आहे. परीक्षेचे हे पाचवे वर्ष असून रविवार१४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत ही परीक्षा संपन्न होणार आहे.परीक्षा केंद्र सोलापूर शहर - लोकराजा अभ्यासिका वेदांत टॉवर,भारती विद्यापीठ जवळ विजापूर रोड सोलापूर आणि मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव ता.माढा असणार आहेत.
इयत्ता ८ वी ते १२ वी आणि १२ वी उत्तीर्ण /पदवी अशा दोन गटात परीक्षा संपन्न होणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना एकूण रोख रु. १५,०००/- शिष्यवृत्ती, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. परीक्षेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असून नावनोंदणी ऑनलाईन पद्धतीने करायची आहे.
परीक्षेची फी,नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी बुद्धजय भालशंकर मो. ९९६०३७२७३६, आशुतोष तोंडसे -७०३८८८३३३९,सुशीलचंद्र भालशंकर -७०२०८५२५५३ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.