मुंबई : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकींच्या निकाल प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. येत्या ३ डिसेंबरला होणारी मतमोजणी रद्द करून नवी तारीख २१ डिसेंबर जाहीर करण्यात आली आहे. नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
राज्यात काही भागांत मतदान प्रक्रिया सुरू असून काही ठिकाणी २० डिसेंबरला निवडणुका होणार आहेत. दोन्ही निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी व्हावी, अशी मागणी करत न्यायालयात याचिका दाखल झाली होती. आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आयोगाला दोन्ही निवडणुकांचे निकाल एकत्र घेण्याचे निर्देश दिले.
हायकोर्टाच्या या निर्देशांनंतर निवडणूक आयोगाने तातडीने मतमोजणीची तारीख बदलत ती २१ डिसेंबर निश्चित केली. या अनपेक्षित निर्णयामुळे उमेदवार आणि पक्षांची उत्सुकता आणखी वाढली असून निकालासाठी राज्याला आता आणखी १८ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या निर्णयामुळे राज्यातील निवडणूक प्रक्रियेला नवे वळण मिळाले असून २१ डिसेंबरचा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
#Electionupdate #highcourt #breakingnews #maharashtra government