स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

राजकारण

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज — उमेदवार निवडीसाठी हालचाली सुरू

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज — उमेदवार निवडीसाठी हालचाली सुरू

सोलापूर, द. तालुका — आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली तयारी अधिक वेगाने सुरु केली आहे. सैफुल येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या भव्य बैठकीत जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा जोश आणि निर्धार ओसंडून वाहताना दिसला.

या बैठकीत उपजिल्हाप्रमुख रविकांत कांबळे, तालुकाप्रमुख रवी घंटे, तालुका समन्वयक गणेश कर्वे, उपतालुकाप्रमुख राजू कोळी, सखाराम वाघ, लक्ष्मण चौगुले, बोरामणीचे माजी सरपंच अनिल ननवरे, दयानंद कोळी, रामदास पवार, वांगीचे सरपंच सुरज खडाकडे तसेच जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विकास डोलारे आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.

बैठकीत निवडणुकीसाठी पक्षाच्या धोरणांवर सखोल चर्चा करण्यात आली. जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,

“दक्षिण तालुक्यात शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकवायचा आहे. मशाल हे केवळ चिन्ह नाही, तर जनतेच्या आशा-आकांक्षांचा प्रतीक आहे. आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने गावोगाव, गल्लीगल्लीत जाऊन मशाल पेटवायची — जनतेचा विश्वास पुन्हा शिवसेनेच्या बाजूला आणायचा.”

बैठकीत प्रत्येक विभागातून इच्छुक उमेदवारांची नावे संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले तसेच निवडणूक लढवताना विकासाच्या मुद्द्यांवर भर देण्याचे ठरले. कार्यकर्त्यांनी “मशाल आमच्या हातात, सत्ता आमच्या वाटेत!” अशा घोषणा देत वातावरण भारावून टाकले.

पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रविकांत कांबळे यांनी सांगितले की,

“ही निवडणूक केवळ राजकारणाची नाही, तर जनतेच्या विकासाची आहे. जनतेला भ्रष्टाचारमुक्त, विकासाभिमुख सत्ता देण्यासाठी शिवसेना सज्ज आहे.”

बैठकीत सोशल मीडिया प्रचार, बूथस्तरीय संघटन, आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण दक्षिण तालुक्यातून कार्यकर्त्यांचा एकच नारा घुमला —
मशाल पेटली आहे, विजय निश्चित आहे!”

राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे की, या रणतयारीमुळे दक्षिण तालुक्यात शिवसेना पुन्हा एकदा प्रभावी पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.

#politics #zpelection #electionupdate #dailypolitics
 

संबंधित बातम्या