सोलापूर | सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या www.solapurcitypolice.gov.in या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन मा. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या संकेतस्थळाच्या नूतनीकरणाचे काम पॉवरकोड टेक्नोलॉजी या कंपनीने पूर्ण केले आहे.
नवीन संकेतस्थळ इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये तयार करण्यात आले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे संकेतस्थळ डेस्कटॉप, लॅपटॉप आणि मोबाईलवर काही सेकंदांत उघडते. संकेतस्थळावर ‘सिटीजन पोर्टल’ची लिंक देण्यात आली आहे, ज्याद्वारे सोलापूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवता येणार आहे.
या संकेतस्थळावर नागरिकांसाठी खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत :
पत्रकार बांधवांसाठी स्वतंत्र प्रेस नोट विभाग
पोलीस आयुक्त ते सहायक पोलीस आयुक्तांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांची माहिती
सर्व पोलीस ठाण्यांचे पत्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे मोबाईल क्रमांक व GPS लोकेशन
नियंत्रण कक्षाचा WhatsApp नंबर व QR कोडद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा
फेसबुक आणि ट्विटरशी थेट जोडलेले पोलीस संकेतस्थळ
‘आपले सरकार’ या शासकीय संकेतस्थळाची लिंक
Google Map वरून प्रत्येक पोलीस ठाण्याचे अचूक लोकेशन
संकेतस्थळामध्ये स्वतंत्र अॅडमिन पॅनल असल्याने दैनंदिन माहिती अद्यावत ठेवता येणार आहे. हे संकेतस्थळ पूर्णपणे युझर-फ्रेंडली असून वापरण्यास सुलभ आहे.
वाहतूक शाखेशी संबंधित नियम, दंड, महिला आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी टिप्स, सायबर सुरक्षा, माहिती अधिकार, पोलीस भरती, तसेच विभागाच्या विविध उपक्रमांवरील बातम्या ‘न्यूज अँड इव्हेंट्स’ या टॅबमध्ये उपलब्ध आहेत.
या प्रकल्पासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उप-आयुक्त अश्विनी पाटील (गुन्हे/विशा), सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन आबाजी माने, वपोनि श्रीशैल गजा (सायबर पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण भोपळे, नागेश इंगळे, पोअं. रतिकांत राजमाने, पोअं. इब्राहिम शेख तसेच पॉवरकोड टेक्नोलॉजीचे पंकज चव्हाण व त्यांची टीम यांनी परिश्रम घेतले.
👉 संकेतस्थळ : www.solapurcitypolice.gov.in