स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

राजकारण

मुंबईत महाविकास आघाडीचा ‘सत्याचा मोर्चा’; लोकशाही आणि निवडणूक आयोगाविरोधात एल्गार

मुंबईत महाविकास आघाडीचा ‘सत्याचा मोर्चा’; लोकशाही आणि निवडणूक आयोगाविरोधात एल्गार

मुंबई | १ नोव्हेंबर २०२५ : - मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर आज महाविकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सहयोगी पक्षांच्या वतीने “सत्याचा मोर्चा” काढण्यात आला. मतदारयादीतील गोंधळ, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरील प्रश्नचिन्ह आणि मतचोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर या मोर्च्याद्वारे महाविकास आघाडीनं सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात तीव्र भूमिका मांडली.

या ऐतिहासिक मोर्चात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, खासदार निलेश लंके, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे नेते अनिल देशमुख, शेकाप अध्यक्ष अरविंद सावंत, आमदार वरुण सरदेसाई, खासदार अनिल देसाई, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, तसेच कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. अजित नवले हे प्रामुख्याने उपस्थित होते.

मोर्च्यात सहभागी नेत्यांनी मतदारयादीतील त्रुटी आणि निवडणुकीतील पारदर्शकतेच्या अभावाबद्दल आवाज उठवला. “मतचोरीला खतपाणी घालणाऱ्या भ्रष्ट निवडणूक आयोगाविरोधात आणि लोकशाही रक्षणासाठी हा मोर्चा काढण्यात आला,” असे नेत्यांनी जाहीर केले.

#SatyachaMorcha #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #RajThackeray #MNS #MVA #SaveConstitution #MumbaiProtest #MaharashtraPolitics #Democracy #ElectionCommission

संबंधित बातम्या