सोलापूर प्रतिनिधी :-4 /10/2025 रोजी रात्री 10:00 वा. ते दि.05/10/2025 रोजीचे सकाळी 06:30 वा. चे दरम्यान विजापूर रोड सोलापूर येथील मंत्री चंडक पार्क समोर असलेल्या बाहुबली नगर येथील बाहुबली जैन मंदिरामध्ये, विविध देव-देवतांच्या पंचधातुच्या मुर्तीं व रोख रक्कम असा एकुण 1,73,000/- रु. किंमतीचा माल, अज्ञात चोरटयांनी चोरुन नेल्या होत्या. त्याबाबत श्री. अनिल हिराचंद माणिकशेटे, वय-65 वर्षे, व्यवसाय :- व्यापार, रा. चक्रवर्ती हौसींग सोसायटी, दयानंद कॉलेज जवळ, भवानी पेठ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विजापूर नाका पो.स्टे सोलापूर शहर येथे गुरनं-478/2025 भा.न्या.सं. कलम 305(डी), 331(4), 334 (1) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
तसेच दि.04/10/2025 रोजी रात्री 11:00 वा. ते दि.05/10/2025 रोजीचे सकाळी 06:00 वा. चे दरम्यान विजापूर रोड येथील रेवणसिध्देश्वर मंदीरासमोरील धान्नम्मा देवीच्या मंदिरातील दान-पेटीतील सुमारे 6000/- रु. रोख रक्कम अज्ञात चोरटयांनी चोरुन नेली होती. त्याबाबत श्री. सिध्दय्या भद्रय्या हिरेमठ, वय-55 वर्षे, व्यवसाय- पुजारी, धान्नम्मा देवी मंदिर, रा. गणेश नगर, विजापूर रोड, सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सदर बझार पो.स्टे सोलापूर शहर येथे गुरनं-801/2025 भा.न्या.सं. कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा व गुन्हे शाखेकडील तपास पथकांनी घटनास्थळास भेट दिली. त्यांनतर, श्री. अरविंद माने, वपोनि/गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी घटनास्थळी मिळालेल्या सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे, पोलीस अंमलदार- इम्रान जमादार यांनी सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची खात्री केली व आरोपीची ओळख पटविली. सदर आरोपीतांचा शोध घेत असताना, दि.05/10/2025 रोजी रात्री सपोनि शैलेश खेडकर यांचे पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार व राजकुमार पवार यांना गोपनिय माहिती प्राप्त झाली की, वरील नमूद मंदिर चोरीतील सराईत गुन्हेगार हे देव-देवतांच्या मुर्ती विक्री करणेसाठी मोदी रेल्वे बोगदायेथे येणार आहेत. त्याअनुषंगाने सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला.
त्यानंतर काही वेळाने मंदिर चोरीतील देव-देवतांच्या मुर्तींसह सराईत गुन्हेगार नामे- (1) आकाश सुरेश पवार, वय-26 वर्षे, व्यवसाय - मजुरी, रा. नेहरु नगर, विजापूर रोड, सोलापूर (2) अशपाक मौला शेख, वय- 27 वर्षे, व्यवसाय - मजूरी, रा. थोरली इरण्णा वस्ती, झो.पटटी नं.2 विजापूर रोड, सोलापूर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांचेकडे अधीक चौकशी केली असता, त्यांनी त्यांचा आणखी एक साथीदार नामे- (3) करण उर्फ करण्या केंगार रा. दमाणी नगर, सोलापूर असे तिघांनी मिळून, विजापूर रोडवरील बाहुबली जैन मंदीरामध्ये व रेवणसिध्देश्वर मंदिरासमोरील धान्नम्मा देवीच्या मंदीरात अशा दोन मंदीरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्यांचे कब्जातील पिशवीमध्ये देव-देवतांच्या पंचधातूच्या एकूण 08 मुर्ती व रोख रक्कम रु. 2000/ असा एैवज मिळून आला.
सपोनि. शैलेश खेडकर व पथकाने गुन्हयाचे तपासात आरोपींकडून, पद्मावती देवीच्या पंचधातूच्या 02 मुर्ती, बाहुबली देवाची पंचधातूची 01 मुर्ती, आदिनाथ देवाची पंचधातूची 01 मुर्ती, जैन धर्मातील 24 तिर्थंकरांची 01 मुर्ती, पार्श्वनाथ देवाची 01 मुर्ती, अनंतनाथ देवाची 01 मुर्ती व शांतीनाथ देवाची 01 मुर्ती अशा देव-देवतांच्या एकूण
08 मौल्यवान मुर्ती व रोख रक्कम रु. 2000/- असा एकुण 1,65,000/-रु. (एक लाख पासष्ट हजार रुपये) किंमतीचा एैवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत करुन, मंदीरातील चोरीचे वरील नमुद 02 गुन्हे 24 तासाचे आत, अत्यंत कमी वेळात, कौशल्याने व अविरत परीश्रमाने उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) श्री. राजन माने, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली, श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा स.पो.नि. श्री. शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, चालक बाळासाहेब काळे तसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.
#solapur #crimenews #solapurcitypolice #crimebranch