सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर शहर गुन्हे शाखेने अवैध शस्त्रांचा वापर रोखण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. माळीवाडा परिसरात सापळा रचून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तूल, दहा जिवंत काडतुसे, एक मोटार सायकल आणि एक इनोव्हा कार असा एकूण ₹१०,१०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक केलेल्या आरोपींची नावे
🔸 फरहान अखिल शेख (वय १९, रा. अमन चौक, सोलापूर)
🔸 सचिन सिधाराम झगडगे (वय ३५, रा. माळीवाडा, सोलापूर) तपासादरम्यान आरोपींनी गुन्हे शाखेच्या पथकासमोर कबुली दिली असून दोघांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, उपआयुक्त डॉ. आनंदी माने, सहाय्यक पोलीस आयुक्त अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्यासह त्यांच्या पथकाने केली. पथकात अनिल लोंढे, महेश शिंदे, शंकर पाटील, कुमार काळे, राजू मुळाल, महेश पाटील, सिधाराम देशमुख आदींचा समावेश होता.
पोलीस आयुक्तांनी या कारवाईबद्दल पथकाचे कौतुक केले असून शहरातील शस्त्रसज्ज गुन्हेगारांविरोधात अशा मोहीमा सुरू राहतील असे सांगितले.
#solapurnews #crimeupdate #solapurpolice #bigupdate