स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

शासन

जिल्हास्तरीय नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष व तालुकास्तरीय कक्षाची स्थापना -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

जिल्हास्तरीय नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष व  तालुकास्तरीय कक्षाची स्थापना -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर (प्रतिनिधी) : - सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त व पूर परिस्थितीमुळे पुरग्रस्त नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, सात रस्ता, शासकीय दुध डेअरी शेजारी सोलापूर येथे नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तर तालुक्याच्या ठिकाणी तालुकास्तरीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून ज्या दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना यांना पूरग्रस्त बाधितांना मदत करावयाची आहे त्यांनी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय मदत कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

     जिल्ह्यातील  नुकसानग्रस्त  व पुरग्रस्तांच्या सार्वजनिक हितासाठी  नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यांत या उद्देशाने मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला असून,  मदत कक्षामार्फत आवश्यक ती मदत करुन बाधित नागरिकांचे प्रश्न तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागांशी संपर्क साधून सोडविण्यात येतील. या मदत कक्षाच्या माध्यमातून 88 बाधित गावांपैकी कोणत्या गावाला कोणत्या प्रकारची मदतीची आवश्यकता आहे याची माहिती दिली जाणार आहे त्यामुळे गरजू बाधितग्रस्तांना केलेली मदत तात्काळ देणे सोयीचे होणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. तसेच पूरग्रस्त यांना मदत करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्हास्तरीय मदत कक्ष अधिकारी व संपर्क क्रमांक :-
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला असून जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार श्री. सैपन नदाफ मोबाईल क्रमांक 83799 81799 तर दूरध्वनी क्रमांक 0217-2990140 यावर संपर्क साधावा.

तालुकास्तरीय मदत कक्षाचे अधिकारी व संपर्क क्रमांक:-
     उत्तर सोलापूर तालुक्यात श्री सुधाकर बंडगर, निवडणूक नायब तहसिलदार, मोबाईल क्रमांक 9881741311, कार्यालयीन क्रमांक 0217-2731014; माढा तालुक्यात श्री प्रितम पवार, पुरवठा निरीक्षक, मोबाईल क्रमांक 9970827574, कार्यालयीन क्रमांक 02183-234031; करमाळा तालुक्यात श्री शतुघ्न चव्हाण, पुरवठा निरीक्षक, मोबाईल क्रमांक 8805907686, कार्यालयीन क्रमांक 02182-220535; बार्शी तालुक्यात श्री संतोष गुलाब शिंदे, पुरवठा निरीक्षक, मोबाईल क्रमांक 9518562532, कार्यालयीन क्रमांक 02184-222213; अपर तहसिल मंद्रुप येथे श्री नवल सरवळे, सहा. महसूल अधिकारी, मोबाईल क्रमांक 9309597368; दक्षिण सोलापूर तालुक्यात श्री विनायक कुलकर्णी, निवडणूक नायब तहसिलदार, मोबाईल क्रमांक 9423331657, कार्यालयीन क्रमांक 0217-2731033; तर मोहोळ तालुक्यात श्रीमती सोनाली निटुरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, मोबाईल क्रमांक 9022008681, कार्यालयीन क्रमांक 02189-232234. नागरिकांनी पूरग्रस्त मदतीसाठी संबंधित तालुक्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

सोलापूर जिल्हायातील पूरग्रस्त बाधीत कुटुंबाना शासना तर्फे किट वाटप करण्यात येत आहे. या किट मध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे. ज्वारीचे पीठ, आटा, हरभरा दाळ, स्वयंपाक तेल, मीठ, तिखट मसाला, हळद, दूध पावडर, मेणबत्ती पाकीट मध्यम आकाराचे, मच्छर आगरबत्ती, काडीपेटी, टॉर्च विथ बॅटरी, इमरजन्सी लाईट,अंगाचे साबण, प्लास्टीक ताडपत्री, चादर, सतरंजी तसेच  पातेला, तवा, ताट, तांबे, वाटी, चमचा, ग्लास, उलतन, पक्कड/सांडशी, पळी (आमटी वाढण्यासाठी), प्लास्टीक बकेट अशा आवश्यक मूलभूत वस्तूंचा समावेश आहे.

या वस्तूंनाच अधिक प्राधान्य असून याव्यतिरिक्तही व्यक्ती, सामाजिक संस्था पूरग्रस्त बाधित नागरिकांना जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मदत कक्ष व तालुकास्तरीय मदत कक्ष यांच्याकडे मदत देऊ शकतात, असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कळविले आहे.

संबंधित बातम्या