सोलापूर (प्रतिनिधी) :- बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी व संचालक मंडळाने मोहोळ तालुक्यातील पुरामुळे बाधित झालेल्या रामहिंगणी, पोफळी, शिंगोली, तरटगाव, , रामहिंगणी, नांदगाव, मासाळ वस्ती मुंडेवाडी, गोटेवाडी, रेल्वे गेट शिरापूर (मो) सावळेश्वर सर्कल मधील सर्व गावे साबळेवाडी, पांडवाची पोकळी, शिरापूर (सो) भांबेवाडी, अष्टे, हिंगणी निपाणी, लांबोटी ,अर्जुनसोंड ,विरवडे खुर्द ,विरवडे बुद्रुक या गावांमध्ये अन्नधान्याची किट मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या किटमध्ये गहू, तांदूळ, तूरडाळ ,रवा, पोहे, शेंगा तेल, लाल तिखट ,मीठ अशा जीवनावश्यक अकरा वस्तूंचा समावेश होता. यावेळी बालाजी अमाईन्सचे जनरल मॅनेजर अरूण मासाळ, मोहोळ तहसीलचे पुरवठा अधिकारी घोडके, पत्रकार कृष्णकांत चव्हाण, सचिन मोरे , दत्तप्रकाश सांजेकर, पवन कुमार ताटी , सावळेश्वर सर्कल प्रकाश दळवी शिरापूरचे तलाठी विशाल कांबळे पोपळी तलाठी निकिता बाबर अष्टे तलाठी दीक्षा सातपुते मोरवंची खुनेश्वरचे तलाठी अर्चना विटकर सावळेश्वर मुंडेवाडी चे तलाठी सतीश बीजले आधी जण उपस्थित होते.
पूरग्रस्ताने मानले बालाजी अमाईन्सचे आभार
सीना नदीला आलेल्या महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना मदतीसाठी बालाजी अमाईन्सने अन्नधान्याचे कीट वाटप केले. सर्वात पहिली मदत वेळेत मिळाल्यामुळे सीना काटच्या सर्व ग्रामस्थांनी बालाजी अमाईन्सचे आभार मानत धन्यवाद दिला. हे तर आमचं नैतिक कर्तव्यच...l मोहोळ तालुक्याबरोबरच ,दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागांमधील सेंटरला अन्नधान्य पुरवठा करण्याचे काम सुरू आहे .जसजशी गरज पडेल त्या पद्धतीने आम्ही साहित्य पोहोच करत आहोत.
शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणून हे आमचं नैतिक कर्तव्य समजतो. असे मत बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले .
#Balajiamines #helpinghands #solapurflood