स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

सामाजिक

‘दारू नाही, दूध प्या’ उपक्रमातून छत्रपती ब्रिगेडकडून नववर्षाचे स्वागत; पोलिसांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान

‘दारू नाही, दूध प्या’ उपक्रमातून छत्रपती ब्रिगेडकडून नववर्षाचे स्वागत; पोलिसांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान

सोलापूर :- सरत्या वर्षाला निरोप देताना पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करत रात्री पार्ट्या, दारू सेवन व झिंगाट वाहन चालवण्याचे प्रकार वाढताना दिसतात. या पार्श्वभूमीवर युवकांना व्यसनापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने छत्रपती ब्रिगेडच्या वतीने नववर्षाच्या मध्यरात्री ठीक १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ‘दारू नाही, दूध प्या’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत नागरिक व युवकांना दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी “दारू नाही, दूध प्या”, “दारूने झिंगला, संसार भंगला”, “धूम्रपान-मद्यपान, आरोग्याची धूळधान”, “उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती”, “व्यसनमुक्तीच्या संकल्पनेने करू या नववर्षाचे स्वागत” असे जनजागृतीपर फलक छत्रपती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतले होते.
तसेच नववर्षाच्या बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्या सेवाभावाचा सन्मान करण्यात आला.
यावेळी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक श्याम कदम, जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके, संपर्कप्रमुख इस्माईल मकानदार, मराठा सेवा संघाचे रमेश जाधव, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मोनाली धुमाळ, जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा कोळी, शहर कार्याध्यक्ष सोनाली सगर, आनंदी धुमाळ, राजनंदिनी धुमाळ, मंगल बनसोडे, गजानंद शिंदे, गौरीशंकर वरपे, ओंकार कदम, शेखर कंठीकर, सुमित मंद्रूपकर, सतीश वावरे, मुस्लिम ब्रिगेडचे फारुख शेख, तसेच वैभव धुमाळ, रियाज शेख, लाला बागवान, ख्वाजा शेख, इरफान सय्यद, सोनू शेख, फजल शेख, शाहिद सय्यद, उमर शेख, बाबा शेख आदी उपस्थित होते.

छत्रपती ब्रिगेडच्या वतीने गेल्या १३ वर्षांपासून युवकांसाठी ‘दारू नाही, दूध प्या’ हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. दारूच्या आहारी जाऊन अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याने युवकांनी व्यसनांपासून दूर राहून दूध पिणे, व्यायाम करणे व सदृढ जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे.
भारतीय संस्कृतीला साजेल अशा पद्धतीने नववर्षाचे स्वागत व्हावे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
श्याम कदम
संस्थापक, छत्रपती ब्रिगेड

 

#Newyear2026 #socialwork #chtrapatibigred #solapurcity

संबंधित बातम्या