मंद्रुप( प्रतिनिधी) :- संघर्ष योद्धा युथ फाऊंडेशन,मंद्रुपच्या वतीने शिक्षणासाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत मंद्रुप गावात 100 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय डॉ. मिताली रेड्डी,संघर्ष योद्धा युथ फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अभिषेक कोरे,केंद्रप्रमुख कलप्पा हेळवी, मुख्याध्यापक कुंभार,मुख्याध्यापिका तांबोळी उपस्थित होते.
यावेळी डॉ.मिताली रेड्डी म्हणाल्या की,
संघर्ष योद्धा युथ फाऊंडेशन हे नेहमी गरजू लोकांच्या अडचणी मदतीचा दूत म्हणून काम करतात आणि त्यांनी जे विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहेत त्याला मनापासून शुभेच्छा व यावर्षीप्रमाणे मी दरवर्षी सक्रिय सहभाग घेईन.
अध्यक्ष अभिषेक कोरे म्हणाले की,
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचण येऊ नये म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत आहोत.
यावेळी मदतकर्ते गुरुनाथ जोडमोटे,गुरुराज कुलकर्णी, शिवानंद सुतार,दिनेश अंजनाळकरअल्ताफ बाजे,ओंकार झेंडेकर,शशिकांत रकटे,बसवराज सुतार यांच सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
संघर्षयोद्धा युथ फाऊंडेशन कडुन तमाम मदतदात्यांचे, उपस्थित मान्यवरांचे, गावातील नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मरूळाराध्य हिरेमठ,उत्कर्ष भागवत,खय्युम मोमीन,प्रसाद खांडेकर, शाम गोसावी,सचिन सुतार,शंतनू जोडमोटे,दत्तात्रय साठे,धनराज कासार,शिवानंद माळी,आरिफ नदाफ आदींनी कठोर परिश्रम घेतले.
#socialwork #Goodnews# mandir #Educational Help