स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

शासन

मराठा आरक्षणावर मुंबईत सरकारची उच्चस्तरीय बैठक; मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सखोल चर्चा

मराठा आरक्षणावर मुंबईत सरकारची उच्चस्तरीय बैठक; मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सखोल चर्चा

मुंबई | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर आंदोलनांचे वातावरण तापलेले असताना, आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील पुढील कायदेशीर, प्रशासकीय आणि धोरणात्मक प्रक्रिया यावर विस्तृत व सखोल चर्चा झाली.

या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्य शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला, शासनासमोर उभे राहिलेले कायदेशीर अडथळे, तसेच आरक्षणासाठी सरकारने आधीच नियुक्त केलेल्या विविध समित्यांचे अहवाल आणि शिफारसी यांचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते.
 

#maratharesrvation #maratha #mumbai #devendrafadnvis 

संबंधित बातम्या