स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

शासन

सोलापुरात मोकाट जनावरांवर महापालिकेची कडक कारवाई; दंड, जप्ती आणि कायमस्वरूपी बंदोबस्ताचे नियम जाहीर

सोलापुरात मोकाट जनावरांवर महापालिकेची कडक कारवाई; दंड, जप्ती आणि कायमस्वरूपी बंदोबस्ताचे नियम जाहीर

सोलापूर :- शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या वाढत्या समस्येमुळे अखेर सोलापूर महापालिकेने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या तक्रारी, वाहतूककोंडी व अपघातांचा धोका लक्षात घेता महापालिकेच्या प्रशासकांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार थेट कारवाईला मंजुरी दिली आहे.

पार्श्वभूमी

दि. ११ जुलै रोजी महापालिकेत जनावर मालक व व. पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत विशेष बैठक झाली होती. या बैठकीत शहरातील सर्व जनावरांना इअर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यासाठी मालकांना एका महिन्यापेक्षा जास्त मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत संपल्याने महापालिका कारवाईला सज्ज झाली आहे.

कारवाईचे नियम

१) इअर टॅगिंग असलेली जनावरे

पहिल्यांदा मोकाट आढळल्यास : मोठे जनावर – ₹10,000 दंड

लहान जनावर – ₹5,000 दंड

दुसऱ्यांदा मोकाट आढळल्यास :

मोठे जनावर – ₹20,000 दंड

लहान जनावर – ₹10,000 दंड

तिसऱ्यांदा पुन्हा आढळल्यास :

जनावर कायमस्वरूपी जप्त करून थेट गोशाळेत ठेवले जाईल.

२) इअर टॅगिंग नसलेली जनावरे

अशी जनावरे कोणताही दंड आकारल्या शिवाय थेट कायमस्वरूपी जप्त करून गोशाळेत ठेवली जातील.

जनावरे सोडवून घेण्याची प्रक्रिया

जप्त झालेली इअर टॅगिंग असलेली जनावरे सोडवून घेण्यासाठी मालकाला –

दंड भरल्याची पावती,

₹100 च्या बॉण्ड पेपरवरील स्वयंघोषणापत्र (२ साक्षीदारांच्या स्वाक्षरीसह) सादर करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया १० दिवसांच्या आत पूर्ण केल्यासच जनावरे परत मिळतील. अन्यथा जनावरे गोशाळेतच राहतील.

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

शहरातील मोकाट जनावरे रस्त्यांवर अपघात, वाहतूककोंडी, तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठीच ही कठोर कारवाई हाती घेतल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

आयुक्तांचे आवाहन

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी जनावर मालकांना स्पष्ट इशारा दिला आहे –

\"आपल्या जनावरांचे तात्काळ इअर टॅगिंग करून घ्या व ती मोकाट सोडू नका. अन्यथा महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाईल, यात कुठलाही दिलासा दिला जाणार नाही.\"

#solapurmuncipalcorporation #strictaction #smc

संबंधित बातम्या