स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

शासन

मध्य रेल्वे सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई वंदे भारत एक्सप्रेस २० कोचसह चालवणार

मध्य रेल्वे सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई वंदे भारत एक्सप्रेस २० कोचसह चालवणार

सोलापूर :- प्रवाशांसाठी ३१२ अतिरिक्त आसने उपलब्ध करून देण्यासाठी ४ अतिरिक्त चेअर कार कोच सोयीस्कर प्रवास सुलभ करण्यासाठी प्रवाशांच्या मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ४ अतिरिक्त चेअर कार कोच वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, 
ज्यामुळे खाली दिलेल्या तपशीलांनुसार ट्रेनची लांबी २० कोचपर्यंत वाढेल:

- ट्रेन क्रमांक २२२२५ सीएसएमटी मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस २८.०८.२०२५ पासून प्रभावी.

- ट्रेन क्रमांक २२२२६ सोलापूर-सीएसएमटी मुंबई वंदे भारत एक्सप्रेस २९.०८.२०२५ पासून प्रभावी.

सुधारित कोच रचना:
२० कोचमध्ये 
- २ एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) मध्ये ५२ आसन क्षमता आहे. 
- १६ चेअर कार (CC) मध्ये ७८ आसन क्षमता आहे. 
- २ चेअर कार (CC) जे कि लोको पायलट आणि गार्ड केबिनच्या शेजारी आहेत ज्यामध्ये ४४ आसन क्षमता आहे. 
एकूण आसन क्षमता - १४४०

या अपग्रेडमुळे मुंबई आणि सोलापूर दरम्यान प्रवाशांना अधिक आसन क्षमता, चांगली सोय आणि सुरळीत प्रवास मिळेल. ४ अतिरिक्त कोचमुळे प्रवाशांना ३१२ अधिक आसने मिळतील.

सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री योगेश पाटील यांनी प्रवाशांना या अपग्रेड केलेल्या सुविधेचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आणि देशाच्या प्रतिष्ठित वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रीमियम प्रवासाचा अनुभव घेण्याचे आवाहन केले आहे.

 

 

#centralrailway #indianrailway #vandebharat
 

संबंधित बातम्या