स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

सामाजिक

सोलापूरात उच्च न्यायालय खंडपीठासाठी पुढाकार; कृती समितीची घोषणा, १५ ऑगस्टला पालकमंत्र्यांना निवेदन

सोलापूरात उच्च न्यायालय खंडपीठासाठी पुढाकार; कृती समितीची घोषणा, १५ ऑगस्टला पालकमंत्र्यांना निवेदन

 सोलापूर:-  सोलापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यासाठी शनिवारी शासकीय विश्रामगृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शहरातील अग्रगण्य वकील मंडळी, वेक अप सोलापूर फाउंडेशन, सोलापूर विकास मंच, गिरीकर्णिका फाउंडेशन यांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ही बैठक सोलापूरच्या न्याय क्षेत्रात माईलस्टोन ठरणार असल्याचे मान्यवरांनी स्पष्ट केले.

बैठकीत “मुंबई उच्च न्यायालय सोलापूर खंडपीठ कृती समिती” स्थापन करण्यात आली. समितीमार्फत येत्या १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, ग्रामपंचायत सरपंच यांना निवेदन देऊन खंडपीठ स्थापनासाठी व्यापक पाठपुरावा करण्यात येणार आहे.

कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापन झाल्याला विरोध नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मात्र सोलापूर खंडपीठाच्या मागणीसाठी धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांचा पाठिंबा मिळाल्याची माहिती देण्यात आली. पुढील मंगळवारी जिल्ह्यातील सर्व तालुका व शहर पातळीवरील वकीलांची विशेष बैठक घेण्याचाही निर्णय झाला.

बैठकीचे अध्यक्षस्थान वेक अप सोलापूर फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी भूषवले. ऍड. खतीब, वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. शिवशंकर घोडके, सोलापूर विकास मंच चे योगिन गुर्जर, एड. राजन दीक्षित, एड. केशव इंगळे, दैनिक कटू सत्य चे संपादक पांडुरंग सुरवसे, गिरीकर्णिका फाउंडेशन चे अध्यक्ष विजय जाधव, एमबीए संघटना अध्यक्ष रुपेश इंगळे, सामाजिक कार्यकर्ते आनंद पाटील, एड. राजेश देशपांडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष आप्पा कन्नुरकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश शिलेदार आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीतून सोलापूर खंडपीठासाठी मोठा लढा उभारण्याची भूमिका स्पष्ट झाली असून, न्याय क्षेत्रातील ही पुढची पायरी ऐतिहासिक ठरणार आहे.

Milind Bhosale Vijay Kundan Jadhav Yogin Gurjar Anand Patil

संबंधित बातम्या