सोलापूर, दि. ०४ :- जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज आयोजित जिल्हा लोकशाही दिन कार्यक्रमात नागरिकांकडून एकूण ३४ तक्रार अर्ज प्राप्त झाले. या कार्यक्रमात ३८ अधिकारी व विभागीय प्रतिनिधी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. अभिजीत पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारी स्विकारून त्या संबंधित विभागांकडे सुपूर्त केल्या. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तक्रारींचे त्वरित व परिणामकारक निराकरण करण्याचे निर्देश दिले.
लोकशाही दिन हा नागरिकांच्या अडचणी, तक्रारी व मागण्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी सर्व संबंधित विभागप्रमुख व अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य असून, नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही होणे हा उद्देश आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना लोकशाही दिनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, तक्रारींचे निवारण हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे प्रतीक ठरेल, असे मत श्री. पाटील यांनी व्यक्त केले.