सोलापूर:-सोलापूर विकास मंचची बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत होटगी रोड विमानतळावरून नाईट लॅंडिंग, ५४ मिटर रस्ता तातडीने पुर्ण करवून घेणे, विजयपूर रोड सर्विस रोड तातडीने मार्गी लावणे व सोलापूरचे क्रिडा विश्व या विषयावर सविस्तर व अभ्यासपुर्वक चर्चा झाली.
होटगी रोड विमानतळावरून नाईट लॅंडिंग/ इंस्ट्रुमेंटेशन लॅंडिंग पुर्वी होते. नाईट लॅंडिंग, इंस्ट्रुमेंटेशन लॅंडिंग साठी आवश्यक ते पापी लाईट्स लावले होते. मधल्या काळात विमानतळ वापरात नसल्याने ती सर्व यंत्रणा खराब झाली व पुढे काढून टाकली अशी माहिती योगिन गुर्जर यांनी दिली. २०१६ साली लोकसभेत नागरी उड्डयन राज्यमंत्री यांनी सोलापूरात नाईट लॅंडिंग व्यवस्था/इंस्ट्रुमेंटेशन लॅंडिंग व्यवस्था आहे असे लेखी उत्तरात माहिती दिली याचे पुरावे केतनभाई शहा यांनी बैठकीत सादर केले.
लोकशाही अण्णाभाऊ साठे चौकातील रेल्वे वरील उड्डाण पूल १५ ॲागस्ट नंतर केव्हाही पाडकामासाठी बंद करण्यात येईल. याला पर्यायी ५४ मिटर रस्ता हा अजुनही अपूर्ण आहे. तो तातडीने पुर्ण होणं गरजेचं आहे. मिलिंद भोसले साहेबांनी बैठकीतूनच मनपा अधिकार्यांना फोन लावून स्टेटस अपडेट घेतले. पाऊस व इतर कारणांमुळे तो रस्ता या वर्षाअखेरीस पुर्ण होणे अशक्य वाटते. हे काम जलदगतीने व्हावे यासाठी मनपा आयुक्त यांची भेट घेतली पाहिजे असे बैठकीत ठरले.
विजयपूर सर्विस रोड तातडीने मार्गी लावावा , कोर्टात केस दाखल आहे म्हणून विलंब होत आहे.
हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे. एखादा मोठा अपघात होऊन जिवीतहानी होऊ नये यासाठी मनपाच्या वकिलांनी कोर्टात जलदगतीने निकाल लाऊन घ्यावा यासाठी मनपा आयुक्त व महापालिका विधी व न्याय विभाग प्रमुख यांची भेट घेण्याचे ठरले.
प्रकाश भुतडा यांनी विद्यापिठातील नियोजित स्टेडियम व एकुणच सोलापूरातील क्रिडा विश्वाची सखोल माहिती दिली.
या बैठकीत सर्वश्री मिलींद भोसले, केतनभाई शहा, सुहास भोसले, नागनाथ माळवदकर, प्रसन्न नाझरे, रेवण आयगोळे , दत्तात्रय अंबुरे, संतोष कांबळे, चक्रपाणी , नागेश लगदिवे , प्रकाश भुतडा, मनोज क्षीरसागर, योगिन गुर्जर, सौ जयश्री तासगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.