स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

तंत्रज्ञान

सोलापूर महानगरपालिका व एम. आय. टी. (M.I.T.) कॉलेज यांच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) विषयक सामंजस्य करार

सोलापूर महानगरपालिका व एम. आय. टी. (M.I.T.) कॉलेज यांच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) विषयक सामंजस्य करार

 सोलापूर :- सोलापूर महानगरपालिका आणि एम. आय. टी. कॉलेज, सोलापूर यांच्यात मा. आयुक्त यांच्या कार्यलायत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या कराराचा उद्देश शैक्षणिक, महापालिकेचे विविध विभाग व शासकीय क्षेत्रात एआयचा प्रभावी वापर करून शहरी प्रशासन अधिक सक्षम करणे हा आहे.

या करारानुसार एम. आय. टी. कॉलेजचे विद्यार्थी आणि संशोधक सोलापूर महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये AI आधारित संशोधन व अंमलबजावणी करतील. यामध्ये डेटा विश्लेषण, नागरी सेवा सुधारणा, स्मार्ट सिटी उपाययोजना, कचरा व्यवस्थापन, घंटा गाडी, पाणी पुरवठा,वाहतूक नियमन इत्यादी क्षेत्रांचा समावेश राहील.

सदर सामंजस्य करारावर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे व एम. आय. टी. कॉलेजचे रजिस्ट्रार डॉ प्रणेश मुरनल, प्राध्यापक आनंद शिंपी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या प्रसंगी मुख्यलेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, सहा. आयुक्त शशिकांत भोसले, नगर सचिव प्रवीण दंतकाळे,अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, संगणक प्रोग्रामर सेन्हल चफळगावकर, मतीन सय्यद दोन्ही आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव प्राप्त होणार असून, सोलापूर महापालिकेच्या तांत्रिक क्षमतेत वाढ होणार आहे. आगामी काळात शहर प्रशासनात AI चा समावेश करून नागरिकांना जलद व प्रभावी सेवा देण्याच्या दृष्टीने हा करार मैलाचा दगड ठरणार आहे, असे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या