स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

तंत्रज्ञान

अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमांमुळे तरुणांना प्रगतीची सुवर्णसंधी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमांमुळे तरुणांना प्रगतीची सुवर्णसंधी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई, ८ ऑक्टोबर : - भारताला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेणारे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या कौशल्य विकास विभागाचे कौतुक करत सांगितले की, “आयटीआयमधील अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम तरुणांना रोजगाराच्या सुवर्णसंधी देणार आहेत.”

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात प्रधानमंत्री मोदी यांच्या शुभहस्ते राज्यातील ४१९ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये या नव्या अभ्यासक्रमांचा ऑनलाईन शुभारंभ झाला.

या प्रसंगी राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री किंजरापू नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

नव्या युगातील अत्याधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण

प्रधानमंत्री मोदी म्हणाले –
“या अभ्यासक्रमांमध्ये रोबोटिक्स, ग्रीन हायड्रोजन, ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन, सोलर ऊर्जा, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अशा काळाच्या गरजेनुसार विषयांचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण भारतातील तरुणांना नव्या प्रगतीच्या वाटेवर नेईल.”

त्यांनी पुढे सांगितले की, केंद्र सरकारने ‘पीएम सेतू योजना’ अंतर्गत ६० हजार कोटी रुपयांची तरतूद करून देशातील आयटीआय संस्थांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कौशल्ययुक्त महाराष्ट्राची ग्वाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले,
“प्रधानमंत्री मोदी यांनी कौशल्य विकासाला नवी दिशा दिली आहे. अत्याधुनिक अभ्यासक्रमांद्वारे ‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र’ घडवण्याचा आमचा निर्धार आहे.”

दरम्यान, राज्यात या अभ्यासक्रमांसाठी एक लाख तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, उद्दिष्ट असलेले ७५ हजारांचे आकडे आधीच पार झाले आहेत. पुढील वर्षभरात ही संख्या पाच लाखांवर नेण्याचे लक्ष्य राज्याच्या कौशल्य विकास विभागाने निश्चित केले आहे.

एकाचवेळी राज्यभर शुभारंभ

प्रधानमंत्री मोदी यांच्या शुभहस्ते नवी मुंबईत या उपक्रमाचे उद्घाटन होत असताना, राज्यातील ५६० संस्थांमध्ये एकाच वेळी विश्वकर्मांच्या साक्षीने कार्यक्रम पार पडला.
“कामगारांना सन्मानाचे स्थान मिळावे, हा प्रधानमंत्री मोदींचा विचार आम्ही या माध्यमातून पुढे नेत आहोत,” असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

#CMOMaharashtra #PMOffice #Devendrafadnvis #NarendraModi
 

संबंधित बातम्या