सोलापूर (प्रतिनिधी) : - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मंगळवारी ९४३ जणांनी विक्रमी रक्तदान केले. शहर मध्य मतदारसंघात तीन ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता रक्तदान शिबिरे आणि समाजोपयोगी कामासाठी तो पैसा खर्च करावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार देवेंद्र कोठे यांनी एमआयडीसी येथील बालाजी मंगल कार्यालय, मोदी येथील श्री अष्टभुजा मंदिर आणि लष्कर बेडर पूल येथील श्री अंबाबाई देवस्थान येथे रक्तदान शिबिर भरविले होते. बोल्ली रक्तपेढी, मल्लिकार्जुन ब्लड बँक, मेडिकेअर ब्लड सेंटर, सोलापूर ब्लड बँक, अथहर ब्लड बँक, सिद्धेश्वर ब्लड बँक यांनी रक्तसंकलन केले.
याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अविनाश महागावकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नु, माजी सभागृह नेता देवेंद्र भंडारे, सोलापूर शहर मध्य विधानसभा मध्यपूर्व मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, मध्य-मध्य अध्यक्ष नागेश सरगम, मध्य पश्चिम मंडल अध्यक्ष नागेश खरात, माजी नगरसेवक रवी कैय्यावाले, माजी नगरसेवक मेघनाथ येमुल, राजकुमार हंचाटे, भारतसिंग बडुरवाले, माजी नगरसेवक अनिल पल्ली, जेम्स जंगम, माजी नगरसेविका मीनाक्षी कम्पल्ली, रामेश्वरी बिर्रू, अंबादास करगुळे, सिद्धाराम खजूरगी,विठ्ठल कोटा,सारिका सुरवसे,राजेश अनगिरे,काशिनाथ झाडबुके, भूपती कमटम,बजरंग कुलकर्णी, यशवंत पाथरूट, दिलीप पतंगे, राजा माने, रमेश यन्नम,आनंद बिर्रु, दत्तात्रय पोसा, माजी नगरसेवक मधुकर वडनाल, संतोष कदम, अविनाश बेंजरपे, ,रवी कोळेकर,सिद्धेश्वर कमटम,अजय यादव, अंबादास बिंगी, जय साळुंके, अंबादास सकीनाल, विजय महिंद्रकर,सिद्धराम ख्याडे,मनोज कलशेट्टी,सुनील दाते, प्रशांत पल्ली विश्वनाथ प्याटी,मनोज पिसके, बाबुराव क्षीरसागर,सतीश तमशेट्टी,किरण भंडारी,सतीश सुरवसे,सुरज बंडगर,तुषार पवार,अक्षय वाकसे,बाबू उपळेकर, सुरेश मोडे, बाबुराव सांगेपग, संजयकुमार कांती, नवनाथ साळुंखे, रुपेश जक्कल, रतीकांत कमलापूरे, समशेरसिंग आंबेवाले, रणजीत दवेवाले, गुलजारसिंग शिवसिंगवाले, सुनील पाताळे, श्रीनिवास जोगी, अनंत गोडलोलु, संदीप ढगे, प्रसाद पल्ली, सुनील गौडगाव, अर्जुन नामदास, अभिषेक चिंता, मुकेश हजारीवाले, नागेश म्हेत्रे आदींची उपस्थिती होती.
चौकट
मतदानाप्रमाणे रक्तदानासाठीही रांगा
आमदार देवेंद्र कोठे यांची विशेषत: शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रचंड लोकप्रियता आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते. परिणामी देवेंद्र कोठे यांचा ५० हजारांच्या मताधिक्याने विजय झाला. आमदार देवेंद्र कोठे यांनी मतदानानंतर रक्तदानाचे आवाहन केल्यानंतर नागरिकांनी ९४३ इतक्या प्रचंड संख्येने रक्तदान करून प्रतिसाद दिला.
कोट
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक दशकांपासून चालत आलेल्या त्यांचा सामाजिक वारसा कायम ठेवत यंदाही वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन आम्हा कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार ही रक्तदान शिबिरे झाली. शहर मध्य मतदारसंघात झालेले विक्रमी रक्तदान हे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील जनतेच्या प्रेमाचे प्रतीक आहे.
देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य