स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

शासन

प्रशासनात शिस्त, विकासाला वेग; आयुक्त डॉ. ओम्बासे यांचा एक वर्षांचा टप्पा साजरा

प्रशासनात शिस्त, विकासाला वेग; आयुक्त डॉ. ओम्बासे यांचा एक वर्षांचा टप्पा साजरा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकाचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आयुक्त पदावरील कार्यकाळाची यशस्वी एक वर्षांची पूर्तता केल्याबद्दल त्यांचा महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. महापालिका मुख्यालयात झालेल्या या छोटेखानी पण उत्साही कार्यक्रमात पुढील कार्यकाळासाठी आयुक्तांना शुभेच्छा देण्यात आल्या.

महापौर कोंड्याल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. ओम्बासे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध विकासकामांना गती मिळाली असून प्रशासनात शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा स्तर उंचावला आहे. नागरिकाभिमुख निर्णयप्रक्रिया राबविताना लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट झाल्याचे त्यांनी नमूद केले.

गतवर्षभरात स्वच्छता मोहिमा, रस्ते व पायाभूत सुविधांची कामे, जलनिस्सारण प्रकल्प, तसेच विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे शहराच्या सर्वांगीण प्रगतीला नवी दिशा मिळाल्याचा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. आगामी काळातही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विकासाची गती कायम राखली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शहराध्यक्ष रोहिणी तळवडकर, उपायुक्त आशिष लोकरे तसेच नगरसेवक प्रथमेश कोठे आणि किसन जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रशासनातील शिस्त आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे सोलापूर शहर नव्या प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

#solapurcity #drsachinombaseias #solapursmc #government

 

संबंधित बातम्या