नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर करताना सर्वसामान्य नागरिक, उद्योग आणि हरित उर्जेला चालना देणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. देश गेल्या १२ वर्षांत वेगाने प्रगतीपथावर असल्याचे सांगत त्यांनी गुंतवणूक वाढ, रोजगारनिर्मिती आणि जीएसटी प्रणाली अधिक सुलभ करण्यावर सरकारचा भर असल्याचे स्पष्ट केले.
अर्थसंकल्पातील कररचना आणि सीमाशुल्क बदलांमुळे काही वस्तू स्वस्त तर काही महाग होणार आहेत.
काय स्वस्त झालं?
सरकारने आरोग्य, हरित ऊर्जा आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी अनेक वस्तूंवरील कर कमी केले आहेत.
🔹 आरोग्य क्षेत्र
कॅन्सरवरील औषधे
मधुमेहाची औषधे
वैद्यकीय उपकरणे
अपघात विमा प्रीमियममध्ये दिलासा
🔹 इलेक्ट्रॉनिक्स व तंत्रज्ञान
मोबाईल फोन
एलसीडी / एलईडी डिस्प्ले संबंधित घटक
लिथियम-आयन बॅटरी
हरित ऊर्जा व ईव्ही
ईव्ही बॅटरी
ईव्ही वाहने
सौर पॅनेल व सोलर संबंधित वस्तू
बायोगॅस उपकरणे
सीएनजी
काय स्वस्त झालं?
सरकारने आरोग्य, हरित ऊर्जा आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी अनेक वस्तूंवरील कर कमी केले आहेत.
🔹 आरोग्य क्षेत्र
कॅन्सरवरील औषधे
मधुमेहाची औषधे
वैद्यकीय उपकरणे
अपघात विमा प्रीमियममध्ये दिलासा
🔹इलेक्ट्रॉनिक्स व तंत्रज्ञान
मोबाईल फोन
एलसीडी / एलईडी डिस्प्ले संबंधित घटक
लिथियम-आयन बॅटरी
🔹 हरित ऊर्जा व ईव्ही
ईव्ही बॅटरी
ईव्ही वाहने
सौर पॅनेल व सोलर संबंधित वस्तू
बायोगॅस उपकरणे
सीएनजी
🔹 सामान्य वापराच्या वस्तू
भारतात तयार केलेले कपडे
क्रीडा साहित्य
बूट
मोटारसायकली
फ्रोझन मासे
🔹इतर दिलासा
परदेशात शिक्षण घेण्याचा खर्च काही प्रमाणात कमी
देशांतर्गत उत्पादनाला चालना देणाऱ्या उद्योगांसाठी सवलती
❌ काय महाग झालं?
आरोग्यास अपायकारक व काही आयात-आधारित वस्तूंवर कर वाढवण्यात आला आहे.
🚬 तंबाखूजन्य पदार्थ
चघळण्याचा तंबाखू
फिल्टर खैनी
जर्दा
गुटखा
🍺 इतर वस्तू
1)दारू
2) पीव्हीसी फ्लेक्स शीट्स
3) इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले
4) भंगार (स्क्रॅप)
5) काही खनिज पदार्थ
6) ऑप्शन ट्रेडिंगवरील कर वाढ
सरकारच्या या निर्णयांमुळे आरोग्य, पर्यावरणपूरक वाहतूक आणि देशांतर्गत उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे, तर तंबाखू आणि मद्यावरील कर वाढीमुळे महसूल वाढीसोबतच सार्वजनिक आरोग्याचा विचारही अधोरेखित झाला आहे.
#budget2026 #nirmalasitaraman #newdelhi #breakingnews #centealbudget