स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

शासन

दीर्घ प्रतीक्षेनंतर सोलापूर महापालिका निवडणूक जाहीर; मतदान 15 जानेवारीला तर 16 जानेवारीला मतमोजणी

दीर्घ प्रतीक्षेनंतर सोलापूर महापालिका निवडणूक जाहीर; मतदान 15 जानेवारीला तर  16 जानेवारीला मतमोजणी

सोलापूर : राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन केली.

मागील पावणेचार वर्ष रखडलेल्या या निवडणुका अखेर लागल्याने कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्त होत आहे निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवार 15 डिसेंबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

23 ते 30 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.
31 डिसेंबर रोजी अर्ज छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दोन जानेवारी 2026 ही शेवटची तारीख आहे.

त्यानंतर तेरा दिवस प्रचाराला देण्यात आले असून 15 जानेवारीला राज्यात महापालिकेसाठी मतदान होणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.

#solapur #mahapalikaelection #breakingnews #electioncommshion

संबंधित बातम्या