सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ सदस्यपदांसाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजन भवन येथे पार पडली. या सोडतीत विविध तालुक्यांतील गट आणि गावांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला या गटांसाठी जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
सोडतीच्या या शासकीय कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील एकूण ६८ जागांसाठी आरक्षण जाहीर झाले असून त्यानुसार खालीलप्रमाणे विभागणी करण्यात आली आहे –
🔹 करमाळा तालुका
पांडे – सर्वसाधारण महिला
वीट – सर्वसाधारण महिला
कोर्टी – सर्वसाधारण महिला
चिखलठाण – सर्वसाधारण
वांगी (१) – सर्वसाधारण महिला
केम – ओबीसी महिला
भोसरे – सर्वसाधारण महिला
मानेगाव – सर्वसाधारण
🔹 माढा तालुका
उपळाई बुद्रुक – ओबीसी महिला
कुर्डू – सर्वसाधारण
टेंभुर्णी – ओबीसी महिला
बेबळे – सर्वसाधारण महिला
मोडनिंब – सर्वसाधारण महिला
🔹 बार्शी तालुका
उपळाई ठोंगे – ओबीसी
पांगरी – सर्वसाधारण महिला
उपळे दुमाला – ओबीसी महिला
पानगाव – सर्वसाधारण
मालवंडी – सर्वसाधारण महिला
शेळगाव (आर) – सर्वसाधारण महिला
🔹 उत्तर सोलापूर तालुका
नान्नज – ओबीसी
बीबीदारफळ – सर्वसाधारण
कोंडी – सर्वसाधारण
🔹 मोहोळ तालुका
आष्टी – सर्वसाधारण
नरखेड – सर्वसाधारण
कामती बुद्रुक – सर्वसाधारण महिला
पोखरापूर – ओबीसी
पेनुर – सर्वसाधारण
कुरुल – सर्वसाधारण
🔹 पंढरपूर तालुका
करकंब – सर्वसाधारण
भोसे – सर्वसाधारण महिला
रोपळे – एससी महिला
गोपाळपूर – सर्वसाधारण महिला
वाखरी – सर्वसाधारण महिला
भाळवणी – एससी महिला
टाकळी – एससी
कासेगाव – ओबीसी
🔹 माळशिरस तालुका
दहिगाव – एससी
मांडवे – सर्वसाधारण
फोंडशिरस – सर्वसाधारण
संग्रामनगर – ओबीसी महिला
माळीनगर – एससी
बोरगाव – एससी
वेळापूर – एससी महिला
निमगाव – ओबीसी महिला
पिलीव – सर्वसाधारण
🔹 सांगोला तालुका
महूद बु. – ओबीसी
एखतपूर – ओबीसी महिला
जवळा – सर्वसाधारण
कडलास – सर्वसाधारण महिला
चोपडी – सर्वसाधारण
कोळा – सर्वसाधारण
घेरडी – ओबीसी महिला
🔹 मंगळवेढा तालुका
संत दामाजी नगर – ओबीसी
हुलजंती – सर्वसाधारण महिला
लक्ष्मी दहिवडी – एससी महिला
भोसे – सर्वसाधारण
🔹 दक्षिण सोलापूर तालुका
बोरामणी – सर्वसाधारण
कुंभारी – ओबीसी महिला
वळसंग – ओबीसी
हत्तुर – सर्वसाधारण महिला
मंद्रूप – सर्वसाधारण महिला
भंडारकवठे – अनुसूचित जमाती महिला
🔹 अक्कलकोट तालुका
चपळगाव – सर्वसाधारण महिला
वागदरी – ओबीसी
जेऊर – एससी
मंगरूळ – एससी महिला
नागणसूर – सर्वसाधारण
सलगर – ओबीसी
सोडतीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून अनेक तालुक्यांमध्ये महिला उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळाल्याचे दिसून आले आहे. तसेच अनुसूचित जाती आणि ओबीसी गटांसाठीही योग्य प्रमाणात आरक्षण देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
#solapurnews #solapurzp #election