स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

शासन

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नातून मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नातून मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध

सोलापूर, दि. 29 :- जिल्ह्यातील माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर, मंद्रूप आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिके आणि घरांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शर्थीच्या प्रयत्नातून इतर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर मुरघास चारा उपलब्ध करून घेण्यात आला असून आजपासून पुरग्रस्त तालुक्यांना चारा वितरणाला सुरुवात झाली आहे.

🔹 आज वितरित चारा
• माढा – 48 टन
• मोहोळ – 40 टन
• उत्तर सोलापूर – 15 टन
• मंद्रूप – 10 टन
• करमाळा – 5 टन
• दक्षिण सोलापूर – 2 टन

जिल्ह्यात दररोज 100 ते 120 टन मुरघास चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयातून बाधित गावांपर्यंत चारा रात्रीपर्यंत पोहोचवला जाईल.

करमाळा तालुक्यात काही रस्ते पाण्याखाली गेल्याने चारा पोहोचण्यात अडचण येत आहे. पाण्याचा विसर्ग कमी होताच चारा तातडीने गावापर्यंत पोहोचवला जाणार आहे.

जिल्ह्याला चारा पुरवठ्याची कोणतीही कमतरता नाही, जोपर्यंत मागणी असेल तोपर्यंत नियमितपणे चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

जिल्ह्यात सर्वप्रथम चारा वितरण सुरू झाल्याचेही त्यांनी नमूद केले. या कामात जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका असून त्यांनी आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडल्याचेही प्रशंसापत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

#solapurnews #IASkumarashriwad #solapurheavyrain #dailyupdate

संबंधित बातम्या